शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सदोष बिले वाटप

By admin | Published: May 31, 2016 11:55 PM

वाळूज महानगर : रांजणगावातील वीज ग्राहकांना सदोष बिलाचे वाटप करण्यात येत असून ग्राहकांना भरमसाठ देयके दिली जात आहेत.

वाळूज महानगर : रांजणगावातील वीज ग्राहकांना सदोष बिलाचे वाटप करण्यात येत असून ग्राहकांना भरमसाठ देयके दिली जात आहेत.वाळूज सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या रांजणगाव शेणपुंजीत जवळपास १० हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. तीन महिन्यांपासून अंदाजे बिलांचे वाटप करण्यात येत आहे. महावितरणकडून फोटो रीडिंग बिलाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र ही जबाबदारी असलेल्या खाजगी एजन्सीकडून अंदाजे बिलाचे वाटप करण्यात येत आहे. ग्राहकांच्या घरी न जाता एजन्सीचे कर्मचारी परस्पर देयके सोपवीत आहेत. अवाच्या सवा बिले दिली जात असल्यामुळे ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे. निर्धारित मुदतीत भरणा न केल्यास पुरवठा खंडित करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देत आहेत. सदोष बिलाची दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकांना वाळूज सबस्टेशनपर्यंत पायपीट करावी लागत आहे. अशातच भरणा करण्यासाठी गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकमेव केंद्र असल्यामुळे सकाळपासून रांगा लागतात. १० हजार ग्राहकांकडून महावितरणला महिन्याकाठी सव्वा कोटी रुपये मिळत असतानाही ग्राहकांना सुविधा दिल्या जात नाहीत. सदोष देयके दुरुस्त करून देण्यास महावितरणचे अधिकारीही चालढकल करीत असल्यामुळे गरीब ग्राहकांची लूट महावितरणकडून सुरू असल्याचा आरोप संतप्त जगदीश देवडे, संदीप देवडे, दीपक बडे, योगेश शेकडे, नारायण गिरी, अमोल घुले, सचिन खाडे, संजय खणके, बाबासाहेब गायकवाड, किशोर नरवडे, रमेश धनुरे आदी ग्राहकांनी केला आहे. ४ जून रोजी त्रस्त ग्राहकांतर्फे महावितरणच्या वाळूज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दीपक बडे, दीपक सदावर्ते आदींंनी दिला आहे.