छत्रपती संभाजीनगर : शहराच्या औद्योगिक परिसरात डिफेन्स पार्क व्हावे, यासाठी ठोस प्रस्ताव घेऊन दिल्लीत या, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, अशी सकारात्मक भूमिका संरक्षणमंत्रीराजनाथ सिंह यांनी शुक्रवारी येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर (सीएमआयए)तर्फे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत मांडली. या संदर्भात दिल्लीत येऊन चर्चा करण्याचे निमंत्रणही संरक्षणमंत्र्यांनी ‘सीएमआयए’च्या पदाधिकाऱ्यांना दिले.
‘सीएमआयए’तर्फे आयोजित ‘मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षणभूमी’ या उपक्रमांतर्गत संरक्षणमंत्रीराजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. भागवत कराड, आदींची उपस्थिती होती.
राजनाथ सिंह म्हणाले की, आपण दिल्लीत संरक्षण पार्कसंबंधी ठोस प्रस्ताव घेऊन या. अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भात काय करता येईल ते पाहू.