वाळूज महानगर : बजाजनगरातील रामलीला मैदानासमोर खदानीच्या मोकळ्या जागेवर लगतचे व्यावसायिक व नागरिक कचरा टाकत आहेत.
प्रशासनाकडून कचरा न उचलता तेथेच जाळून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बाजूलाच महादेव मंदिर, गजानन महाराज मंदिर व महाविद्यालय आहे. मंदिरात तसेच विद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांसह रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने खदानीच्या जागेवर कचºयाची विल्हेवाट न लावता अन्यत्र लावावी, अशी मागणी भाविक, पालक व नागरिकांमधून केली जात आहे.