शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

औरंगाबाद-नगर महामार्गावरील अतिक्रमणे हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:24 PM

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद-नगर: जागतिक बँक प्रकल्पातर्फे ग्रामपंचायतीना नोटिसावाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर विविध व्यवसायिक व नागरिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या या महामार्गावर औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी भागांतील हजारो वाहनांची रात्र-दिवस ये-जा सुरु असते. मात्र, ग्रामपंचायत हद्दीतून जाणाºया या महामार्गावर विविध व्यवसायिकांनी अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्याकडेला भाजी मंडई, मच्छी मार्केट, गॅरेज, पानटपºया, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आदीसह अनेकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. याचबरोबर हॉस्पीटल, कापड दुकानदार, दुचाकी व तीन चाकीचे शोरुम असणारे व्यवसायिक आदींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची सतत कोंडी होत आहे.

या महामार्गाच्या दुतर्फा जडवाहनधारक रस्त्याच्याकडेला वाहने उभी करीत असल्यामुळे ये-जा करणाºया दुचाकीस्वार, छोटे वाहनधारक व पादचाºयांना जिव मुठीत धरुनच ये-जा करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणासाठी जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून वाळूज, पंढरपूर, तिरंगा चौक, सिडकोमहानगर आदी ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली होती.

त्यानंतर जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाºयांनी लोखंडी बॅरिकेटस् व फुटपाथ न उभारल्यामुळे अल्पवधीतच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. आजघडीला गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यंत या महामार्गावर अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच असून रस्ते अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

ग्रामपंचायतींना नोटीसाऔरंगाबाद-नगर महामार्गालगत वाळूज, पंढरपूर, तीसगाव व वळदगाव, लिंबेजळगाव, ढोरेगाव आदी ग्रामपंचायतीच्या हद्दी आहेत. अपघाताचा धोका टाळण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, यासाठी जागतिक बँक प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी एस.वाय.औटी यांनी या चार ग्रामपंचायतींना नोटिसा बजावल्या आहेत.

वेळकाढू धोरणवाळूज परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतून हा महामार्ग गेलेला आहे. गावातील बेरोजगार तसेच विविध व्यवसायिकांनी या महामार्गालगतच्या जागेवरच अतिक्रमणे करुन व्यवसाय थाटले आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा नसल्यामुळे अतिक्रमणे हटविण्यास ग्रामपंचायती वेळकाढू धोरण अवलंबीत असल्याची चर्चा आहेत.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद