सुरेश चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककन्नड : अंगणवाडीतील बालके आणि शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना संदर्भीय सेवा मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएचके) हाती घेतला. कार्यक्रम हाती घेण्याचा शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. एका पथकात एक वैद्यकीय अधिकारी (पुरुष), एक वैद्यकीय अधिकारी (महिला), औषधनिर्माता आणि एक परिचारीका याप्रमाणे समावेश आहे. तथापी, तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात महिला वैद्यकीय अधिकारीच नाहीत. तर तालुक्यासाठी सहा पथक असताना फक्त चारच पथक कार्यरत आहेत. कन्नड ग्रामीण रूग्णालयांतर्गत ३ पथक असताना दोनच पथक कार्यरत आहेत.महिला वैद्यकीय अधिकाºयाव्यतिरिक्त पथकात प्रत्येकी तीन जणांची आवश्यकता असताना दोन्ही पथक मिळून फक्त पाच कर्मचारीच आहेत. तशातही दोन पथकांपैकी आलटून पालटून एक पथक ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयात सकाळी १० ते १२ या वेळेत बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे अंगणवाडीतील बालके आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एकच पथक कार्यरत आहे.कन्नडच्या ग्रामीण रूग्णालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पथकांकडे वडनेर आणि नागद विभाग मिळून १४६ अंगणवाड्या तर ९१ शाळा आहेत. विशेष म्हणजे चिकलठाण विभागातील अंगणवाड्या आणि शाळा तपासणीसाठी पथकच नाही.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात अंगणवाडीतील ० ते ६ वयोगटातील बालकांची वर्षातून दोनवेळा तर ६ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करुन आवश्यक ती संदर्भसेवा पुरवावी लागते. मात्र आधीच तीनपैकी दोनच पथक त्यापैकी एक पथकावर बाह्यरुग्ण विभाग शिवाय पल्स पोलिओ आणि लसीकरणाचे काम हा भार आहे.च्पिशोरच्या पथकातही वैद्यकीय अधिकाºयासह तीन जण आहेत. या पथकाकडे १२१ अंगणवाड्या आणि ८९ शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी आहे.
कन्नड तालुक्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:54 AM