- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : जीएसटीचे बनावट 'इनपुट टॅक्स क्रेडिट '(आयटीसी) १० कोटीचा घोटाळा करुन सरकारची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील व्यापाऱ्याला शुक्रवारी (दि.४) शहरात रात्री अटक करण्यात केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्त कार्यालयाला यश आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील व्यापारी समीर मलिक यांनी औरंगाबादेत २०२० मध्ये लोखंडी कचरा आणि भंगार इत्यादीच्या व्यापारासाठी फर्म स्थापन केली. त्याची जीएसटीमध्ये रीतसर नोंदणी केली. त्या व्यापाऱ्याने प्रत्यक्ष व्यवहार न करता अंदाजे ६० कोटीची विक्री बील तयार केले. यातून त्याने १० कोटीचे इनपूट टॅक्स क्रेडिट पास केले. तपासणीमध्ये बनावट आयटीसीचा घोटाळा केंद्रीय जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांना दिसून आला.
त्या व्यापाऱ्याने औरंगाबादेतील ३० ते ४० व्यवसायिकांच्या नावाने बील फाडले आहेत. बनावट आयटीसीद्वारे सरकारची फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याचे सत्य समोर येताच अधिकाऱ्यांनी समीर मलिक या व्यापाऱ्यास रात्री शहरातच अटक केली व सिडको पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्यास ठेवण्यात आले. उद्या शनिवारी त्या व्यापाऱ्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सीजीएसटी विभाग करीत आहे.
राज्य परराज्यात व्याप्तीबनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची व्याती मोठी आहे.यात ज्या व्यवसायिकांच्या नावाने विक्री बील फाडण्यात आले ते व्यवसायिक औरंगाबाद, दिल्ली, हैद्राबाद आदी महानगरातील आहेत. याची व्याप्ती मोठी असून सुमारे १०० कोटीच्या घरात हा घोटाळा असून शक्तो असे सूत्रानी सांगितले.