शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले

By सुमित डोळे | Published: September 11, 2024 2:47 PM

सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांनी नियम, शिस्तीचे पालन करावे, महिला व तरुणींसोबत वागणूक चांगली ठेवावी, अशी तंबी सहायक पोलिस आयुक्तांनी सोमवारी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी केलेल्या पाहणीत एकाही रिक्षाचालकाला त्याचे गांभीर्य नसून, बेशिस्तपणा कायम असल्याचे दिसून आले. ६० टक्के रिक्षाचालक गणवेशात होते. मात्र, कोणाच्याच ड्रेसवर बॅच, बिल्ला दिसला नाही. त्यामुळे बहुतांश रिक्षाचालक विनापरवाना असल्याचे समोर आले.

वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सोमवारी रिक्षाचालक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. गणवेश, बॅच, बिल्ला वापरा, प्रवाशांवर दादागिरी करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर पाहणी केली, तेव्हा एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

चुकीच्या रस्त्याने नेले, जास्त पैसे मागितले, महिलेने दिला चोप४० वर्षीय महिला मुलीसह दुपारी पुंडलिकनगरातून मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी सिटरच्या दराने रिक्षात बसली. चालकाने तिला मुख्य रस्त्याऐवजी गल्लीबोळातून नेले. महिलेने त्याला वारंवार विचारणा केली. मात्र, हाच रस्ता योग्य आहे, असे सांगत त्याने रिक्षा दामटली. एकाही प्रवाशाला बसवले नाही. बस स्थानकावर उतरल्यानंतर ३० रुपये ठरलेले असताना, ६० रुपये मागितले. यावरून महिलेने त्याला सुनावल्याने वाद वाढला. चालकाने अरेरावी सुरू केल्याने महिलेने थेट चप्पल काढून त्याला बदडण्यास सुरुवात झाली. जमलेली गर्दी व महिलेचा चढलेला पारा पाहून चालक निघून गेला. या घटनेमुळे महिलेची मुलगी घाबरून रडायला लागली होती.

कुठे काय आढळले?स्थळ : महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप)वेळ : दुपारी २ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर रिक्षाचालक उभे होते. दोन रिक्षाचालक एका प्रवाशाच्या अंगावर जाऊन रिक्षात बसण्यासाठी मोठ्या आवाजात हट्ट करत हाेते. प्रवासी एका रिक्षात बसला. मात्र, दुसऱ्या चालकाने मी त्याला आधी बोललो, म्हणून प्रवाशाला त्या रिक्षातून उतरायला भाग पाडले.

स्थळ : मध्यवर्ती बसस्थानकवेळ : दुपारी १बसस्थानकासमोरील दोन्ही बाजूचे अर्धेअधिक रस्ते रिक्षाचालकांनी व्यापले होते. भर रस्त्यात रिक्षा उभी करून प्रवासी शोधायला लांबपर्यंत जात हाेते. सिटी बसमध्ये बसण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांसमोर जात कर्कश ओरडून रिक्षात बसण्यासाठी हट्ट करत होते.

स्थळ : सुतगिरणी चौक मार्गवेळ : दुपारी ४:३०एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रिक्षाचालकाने स्वत:च्या बाजूला बसवले होते, तर एका रिक्षाला मागे गेट नसतानाही प्रवाशाला बसवले होते. वळणाच्या ठिकाणांवरूनही तो सुसाट जात होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादauto rickshawऑटो रिक्षा