राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करुन ठिबक सिंचनावर कापसाची लागवड केली आहे; परंतु लांबत चाललेल्या पावसामुळे आणि उगवून आलेल्या कोवळ्या पिकांवर मातीमधील वेगवेगळ्या किटकांनी हल्ला चढवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.राणी उंचेगाव परिसरामध्ये मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यापासून एकही पाऊस झालेला नाही. यावर्षी या भागामध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवरील कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहे. काही शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच कापसाची लागवड केली आहे. तर काही शेतकरी लागवडीच्या तयारीमध्ये आहे. राणी उंचेगाव कृषी मंडळामध्ये खरीप हंगामातील २२ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १५ हजार हेक्टरवर कापसाचे क्षेत्र आहे. जवळपास मंगू जळगाव, शिंदे वडगाव, पानेवाडी, शेवगळ या गावांमध्ये प्रतिगाव ५० हेक्टरच्या पुढे क्षेत्र वाढत असल्याचे कृषी पर्यवक्षक एन. सी. शेख यांनी सांगितले. ठिबक सिंचनवर कापूस लागवडीचे क्षेत्र मंडळामध्ये ७५० हेक्टरपर्यंत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या क्षेत्रामध्ये वाढ अपेक्षित आहे. कापसाची उगवण झालेल्या कोवळ्या रोपट्यांवर जमिनीमधील किटक हल्ला चढवत आहेत. त्याचबरोबर अद्यापपर्यंत पाऊस झाला नसल्यामुळे उन्हाचा परिणाम पिकांवर जाणवत असल्याचे राजेंद्र शिवतारे यांनी सांगितले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याविषयी उपविभागीय कृषी अधिकारी तौर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, येणाऱ्या खरीप हंगामात कृषी शाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल. (वार्ताहर)मृग नक्षत्र कोरडेचराणी उंचेगाव परिसरामध्ये मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यापासून एकही पाऊस पडलेला नाही. यावर्षी या भागामध्ये शेतकऱ्यांनी कापसासाठी ठिबक सिंचनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
ठिबकवर लावलेल्या कपाशीची नाजूक स्थिती
By admin | Published: June 17, 2014 12:09 AM