ग्रामसेवक गायकवाड हे औरंगाबाद येथे राहत असल्याने त्यांना अप-डाऊन करणे परवडत नाही. यामुळे ते आठ दिवसांतून एक दिवस येतात. येथील ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांपैकी सात महिला सदस्य आहेत. ग्रामसेवक गायकवाड हे सदस्यांसह सरपंचांनाही कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत. जमा-खर्च हिशेब दाखवत नाहीत, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही गावांत औषध फवारणी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ग्रामसेवक गायकवाड यांना सांगितले, मात्र त्यांनी पैसे नसल्याचे कारण सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या कामचुकार ग्रामसेवकाची बदली करावी, अशी मागणी सरपंच ताराबाई गांगुर्डे, उपसरपंच अर्चना फुलारे, सदस्य अशोक बोरसे, सुनीता दरेकर, विमल गायकवाड आदींनी केली आहे.