जीवनावश्यक वस्तूची भाववाढ २५ टक्कांने कमी करण्याची मागणी
गंगापूर : पेट्रोल, डिझेल व खाद्यतेल भाववाढीच्या निषेधार्थ एमआयएमने जोरदार निदर्शने करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करून भाववाढ कमी करण्याची मागणी केली. शासन विविध करांच्या नावाखाली पेट्रोल व डिझेलवर अनुक्रमे २५ व २२ टक्के कर आकारत आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारने भाववाढ २५ टक्क्यांपर्यंत कमी करावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. निवेदनावर राहुल वानखेडे, फैसल बासोलान, वैभव खाजेकर, अशफाक पटेल, जुनेद शेख, अजित जाधव, ॲड. मयूर मोकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-- फोटो
180621\img-20210618-wa0046.jpg
गंगापूर - भाववाढीच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतांना एमआएमचे पदाधिकारी