वाळूज महानगर: धनगर समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाण व गोपीचंद पडळकर युवा मंचतर्फे बजाजनगर येथे रविवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निवडणुकापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर रविवारी सकाळी सरकारचा काळे झेंंडे घेवून निषेध करण्यात आला. सुुरुवातीला महिलांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी मंचचे उपाध्यक्ष गणेश रोडगे, सुरेश डोळझाके, लखनलाल कुकलारे, गुलाब पोले, छाया कुकलारे, मंदा भोकरे, जयश्री घाडगे, उषा हांडे, छाया जाधव, जयश्री रोरे, पार्वती गोरे, सुनिता बाचकर, सविता खोसे, सुनिता शिंदे, सरोजिनी पोले, अशोक भांड, नागेश कुकलारे, ज्ञानेश्वर गडरी, स्वनेश लांडगे, सुमित खताळ, ताराचंद खोसे आदींची उपस्थिती होती.