लॉकडाऊन झाल्यापासून घाटनांद्रामार्गे वाकी मुक्कामी येणाऱ्या बसेस बंद आहेत. वाकी येथे शिवेश्वराचे प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आगाराची औरंगाबाद-वाकी, सिल्लोड आगाराच्या औरंगाबाद-वाकी, सिल्लोड-वाकी चिंचोली लिंबाजीमार्गे व सिल्लोड-वाकी घाटनांद्रा, टाकळी अंतूर, घाटशेंद्रा मार्गे या बसेसच्या फेऱ्या वाकी मुक्कामी सुरू होत्या. मात्र, कोरोनामुळे त्या बंद करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू सर्व नियम शिथिल करण्यात आल्याने लालपरी रस्त्यावर धावू लागली असली तरी, येथील बस सुरु केल्या नाहीत. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नाईलाजाने प्रवाशांवर पायपीट करीत घर गाठण्याची वेळ आली आहे. याचा गैरफायदा घेत खाजगी वाहनचालक प्रवाशांची आर्थिक लूट करीत असल्याने येथे बससेवा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
वाकी मुक्कामी येणाऱ्या बसेस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:21 AM