कन्नड आगाराने पूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी कन्नड-जळगाव ही घाटनांद्रामार्गे बससेवा सुरू केली होती. ही बस कन्नड तालुक्यात असलेल्या चिंचोली लिंबाजी, टाकळी अंतूर, घाटशेंद्रा, वाकी, नेवपूर, तसेच लोहगाव, घाटनांद्रा व इतर ठिकाणच्या ग्रामस्थांसाठी ही बस मोठी सोयीची ठरत होती. यामुळे बसमध्ये नेहमी गर्दी राहत होती. विशेष म्हणजे सिल्लोड आगाराची सकाळची सिल्लोड-पाचोरा ही नऊ वाजल्यानंतर घाटनांद्रा येथे येणारी बस निघून गेल्यावर या मार्गावर एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एक वाजता येणाऱ्या सिल्लोड-पाचोरा या बसची वाट पाहत बसावे लागते. किंवा दुसऱ्या मार्गाने जास्तीचे पैसे खर्च करून पाचोरा किंवा जळगाव या ठिकाणी जावे लागते. यामुळे प्रवाशांना वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कन्नड जळगाव ही बस घाटनांद्रा येथे सकाळी साडेनऊ वाजता येत होती. त्यामुळे या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, लाॅकडाऊनपासून बंद झालेली ही बस अद्याप सुरू झाली नाही. या मार्गावर बसेसची संख्या कमी असल्याने कन्नड आगाराने बंद केलेली कन्नड जळगाव ही बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी राजू गुळवे, सुधाकर आप्पा कोठाळे, शरद बागुल, रंगनाथ मोरे, गोकुळ सोनवणे, राजू सोनवणे, शांतलिंग कोठाळे, संदीप शिंदे, गणेश मनगटे, सुमित जैस्वाल, आदींसह प्रवाशांनी केली आहे.
फोटो आहे.