येथील शासकीय गट क्रमांक २ मध्ये बौद्ध समाजाची स्मशानभूमी असून, या ठिकाणी ग्रामपंचायतीने म्हसनजोगी यांचे निवासस्थान व स्टोअर रूमचे बांधकाम केले आहे. आता या स्मशानभूमीच्या जागेवर सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम ग्रामपंचायतीने नुकतेच सुरू केले आहे. या स्वच्छतागृहांमुळे स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडणार असल्याची भीती समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. स्मशानभूमीच्या स्वच्छतागृहाच्या बांधकामामुळे जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी सुरू असलेले सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम थांबविण्यात यावे; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अशोकराव कानडे, संघराम धम्मकीर्ती, अमृतराव डोंगरदिवे, आदींनी दिला आहे. या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, आदींना निवेदनही देण्यात आले आहे.
--------------------
बजाजनगर-वडगावात कोविड लसीकरण सुरू करा
वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावात कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या आरोग्य विभागाच्या वतीने कोविड लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. या भागातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी पंढरपुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील लसीकरण केंद्रात जावे लागत आहे. पंढरपूरच्या लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळत असल्याने बजाजनगर व वडगाव परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. बजाजनगर परिसरात बहुतांश कामगार वर्ग वास्तव्यास असल्याने त्यांना लसीकरणासाठी कंपनीत दांडी मारावी लागत आहे. याचबरोबर बजाजनगर व वडगावातून पंढरपूरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने वेळही वाया जात आहे. बजाजनगरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर शेळके व खासदार डॉ. भागवत कराड यांना निवेदन दिले आहे.
------------------------------