वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे नागरी वसाहतीतून खाजगी टँकर पाण्याची वाहतूक करीत आहेत. या टँकरच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची भिती नागरिकातून व्यक्त केली जात आहे.
येथील ओमसाईनगरातुन खाजगी टँकरद्वारे पाण्याची ने-आण सुरु असते. या टँकरच्या वर्दळीमुळे ओमसाईनगर ते रांजणगाव फाटा या रस्त्यावर कायम वाहतुकीची कोंडी होते. तसेच नागरी वसाहतीतील नागरिक, महिला व लहान मुले यांना जिव मुठीत धरुनच या वसाहतीतून ये-जा करावी लागत आहे. टँकरची सारखी ये-जा सुरु राहत असल्यामुळे रांजणगाव फाटा ते ओमसाईनगर दरम्यान सतत वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारक व नागरिकांना वळसा टाकुन ये-जा करावी लागत आहेत. संबंधित वॉटर सप्लायर्सला ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.