लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घाणीच्या साम्राज्यातून निर्माण झालेल्या डासांमुळे नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेवराई व वडवणी तालुक्यात दोन लहान मुलांना डेंग्यू झाल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुपोषण, काविळीनंतर डेंग्यूने डोके वर काढल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गत महिन्यात माजलगाव तालुक्यात कुपोषित बालके आढळल्याने आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला होता. आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेत अंगणवाडी, शाळांमध्ये जाऊन मुलांची तपासणी करण्यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या. कुपोषणाच मुद्दा शांत होत नाही, तोच काविळीसारख्या आजाराने डोके वर काढले आहे.जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांमध्ये कावीळ आजार जडलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये २ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांचा अधिक समावेश असल्याचे समोर आले होते.काविळीवर उपाययोजना करतानाच आता पुन्हा डेंग्यू या साथरोगाचे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी जनजागृतीसाठी आरोग्य प्रशासनाने तात्काळ मोहीम हाती घेण्याची मोहीम सर्वसामान्यांमधून होत आहे.