लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, बीड व परळी तालुक्यांमध्ये तापेच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेवराई तालुक्यातून घेण्यात आलेले ४० रक्त नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर याच तालुक्यातील कोमलवाडीत डेंग्यूचा उद्रेक आरोग्य विभागाने घोषित करून उपाययोजना सुरू केल्या आहेत.पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या डपक्यांमध्ये डासांची पैदास वाढली. तसेच स्वच्छ पाण्याच्या साठ्यांमुळे डासांचा उपद्रव घराघरापर्यंत पोहचला. मागील काही दिवसांपासून ग्रामीणसह शहरी भागातील शासकीय आणि खाजगी रूग्णालयांमध्ये डेंग्यू, न्यूमोनिया, तापेचे रूग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात डेंग्यू, कावीळचा उद्रेक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागला. डास प्रतिबंधक अॅबेट २०० लिटर उपलब्ध झाले आहे.दरम्यान, साथरोगाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार यांनी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिका-यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
कोमलवाडीत डेंग्यूचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:02 AM