शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

उपमहापौर, स्थायी समितीसाठी स्पर्धा

By admin | Published: May 08, 2016 11:26 PM

लातूर : लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, उपमहापौर कैलास कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे़

लातूर : लातूर मनपाच्या स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, उपमहापौर कैलास कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे़ त्यामुळे उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे़ त्याचबरोबर गटनेत्याचीही नवीन निवड केली जाणार आहे़ माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना गटनेतेपदाची संधी दिली जाणार असल्याची मनपात चर्चा आहे़ उपमहापौरपदासाठी प्रभाग समितीचे सभापती चाँदपाशा घावटी, किशोर राजुरे, रविशंकर जाधव यांची नावे चर्चेत आहेत़ स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी प्रभाग समितीचे माजी सभापती प्रा़ राजकुमार जाधव, रविशंकर जाधव, अजगर पटेल यांच्या नावाची चर्चा आहे़ महापौरपदाची संधी हुकल्याने अजगर पटेल यांना सभापतीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे़ आगामी मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व समाजघटकांना संधी देण्यासाठी काँग्रेसची खेळी आहे़ त्यानुसार प्रभाग समितीच्या सभापतींच्याही नवीन निवडी होणार आहेत़ विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडेच सभापतीपद राहण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)ाहापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी मनपातील गटनेता बदलाचे संकेत दिले़ यावेळी उपस्थित गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी त्यास होकार दर्शविला आहे़ त्यामुळे काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांची निवड निश्चित असल्याची चर्चा आहे़ शिवाय, माजी उपमहापौर सुरेश पवार, अ‍ॅड़ समद पटेल यांची नावे चर्चेत आहेत़ प्रभाग समितीच्या सभापती निवडीत महिलांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे.