तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या वडिलांच्या नावे बिडकीन येथील सिटी सर्व्हे नंबर १२५९ मधील वाटणी पत्राद्वारे वाट्याला आलेली जागा १२९.५ चौ.मी. क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तालुका भूमी अभिलेख, पैठण यांच्याकडे पाठविल्याने त्यांनी उपअधीक्षक, तालुका भूमी अभिलेख यांच्याकडे जाऊन ही नोंद करण्याबाबत विचारणा केली. यावेळी उपअधीक्षक जे. एम. शितोळे यांनी, नोंद घेण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. यावरून तालुका भूमी अभिलेख कार्यालय पैठण येथे एसीबीच्या पथकाने १५ फेब्रुवारी रोजी सापळा रचला. तक्रारदाराकडून उपअधीक्षक शितोळे यांना १५ हजारांची रक्कम स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडले. याप्रकरणी शितोळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रवींद्र डी. निकाळजे, कर्मचारी ज्ञानदेव मुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, ज्ञानेश्वर म्हस्के, गजानन घायवट, जावेद शेख, शिवाजी जमधडे, गणेश चेके, सचिन राऊत, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, गजानन कांबळे व चालक प्रवीण खंदारे, आरेफ शेख यांनी केली.
फोटो : शितोळे
160221\sanjay ramnath jadhav_img-20210216-wa0008_1.jpg
शितोळे