आंबा अतिशय गुणकारी आहे. रोज एक आंबा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढते. त्यामुळे सध्याच्या कोरोनाकाळात तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा आणि चविष्ट उपाय म्हणजे आंबे खाणे. आंबा खाल्ल्याने स्नायुंना बळकटी मिळते. तसेच व्हिटॅमिन बी ६ देखील आंब्यातून मिळते. या गुणांमुळेही आंबा आवर्जून खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
चौकट :
आंब्याचे दर
गुजरात केशर- १०० ते १३० रु. किलो
मराठवाडा केशर - १३० ते १५० रु. किलो
रत्नागिरी हापूस- ७५० ते १००० रु. डझन
देवगड हापूस- ५५० ते ६०० रु. डझन
पायरी आंबा- १०० रु. किलो
गावरान आंबा- ७० ते ९० रु. किलो
कर्नाटक हापूस- ५०० ते ६०० रु. डझन.
चौकट :
१. निर्यातीवर परिणाम
कोरोनामुळे आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. आता केवळ आखाती देशांमध्ये काही भागात आंब्याची निर्यात होत आहे. असे असले तरी अजूनही आंब्याचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले असे होणार नाही. साधारण अजून एखाद्या आठवड्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे येतील. त्यानंतर दर उतरण्याची शक्यता आहे. लोकांकडून यावर्षीही मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदी केली जात आहे, हे मात्र नक्की.
- सुशील बलदवा
महाकेशर आंबा संघ, अध्यक्ष तथा शेतकरी उत्पादक
चौकट :
विक्रेते म्हणतात आंब्याचे भाव वाढले
१.वातावरणातील बदलामुळे यंदा कोकणात कमी प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडी भाव वाढ आहे. जी पेटी मागील वर्षी २१०० रुपयांना विकली जात होती, ती आता ३ हजारच्या आसपास विक्री होत आहे.
- सुबोध जाधव
२. मराठवाड्यातला उत्तम दर्जाचा केशर जवळपास १५० रुपये किलो या दराने मिळतो आहे. मागच्या वर्षी हा आंबा साधारण ८० ते १०० रुपये या दराने विकला जात होता. त्या तुलनेत आजचा भाव पाहता यावर्षी अजूनही आंब्याचे भाव चढेच आहेत.
- मंगेश निरंतर.