शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

‘लम्पी’ नियंत्रणात तरीही जनावरांचे मृत्यूसत्र थांबेना, तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटात

By विजय सरवदे | Published: November 02, 2022 8:17 PM

जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- विजय सरवदे

औरंगाबाद : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लम्पी साथरोग आटोक्यात आली असली तरी बाधित पशुधनाचे मृत्यूसत्र थांबायचे नाव घेत नाही. सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू असून,यापैकी ९९ जनावरांची परिस्थिती गंभीर आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘लम्पी’ग्रस्त ३३२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. या आजाराने रोज ४-५ जनावरांचा मृत्यू होत आहे,ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की,जिल्ह्यात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. एकूण ५ लाख ३८ हजार ५७२ गोवंश पशुधन असून आजपर्यंत ५ लाख ४५ हजार ५९१ एवढ्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडल्यामुळे त्या त्या पशुचिकित्सालयांमार्फत ‘डिप्लोमा’धारकांकडूनही लसीकरण केले जात आहे. त्यांना प्रती लस ५ रुपये याप्रमाणे मोबदला दिला जातोय. दरम्यान, जनावरांचे लसीकरण झाल्यानंतर पशुपालक चिंतामुक्त होत आहेत. जनावरांना होणाऱ्या त्रासाकडे बारीक लक्ष ठेवल्यास वेळीच उपचार मिळून ते रोगमुक्त होऊ शकतात. पण,असे होताना दिसत नाही. त्यामुळेच मृत्यूसत्र थांबत नसल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ६७३ बाधित जनावरांपैकी उपचार मिळाल्यामुळे तब्बल ३ हजार २९७ जनावरे रोगमुक्त झाली असून सध्या बाधित १ हजार ४४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. जि.प. पशुसंवर्धन विभागाने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेल्या मोहिमेमुळे रोगमुक्त होणाऱ्या जनावरांचे प्रमाण समाधनकारक आहे.

तुटपुंज्या मोबदल्यामुळे पशुपालक संकटातशासनाने लम्पी साथरोगामुळे दगावणाऱ्या पशुधनासाठी नुकसानभरपाईपोटी मोबदला देऊन पशुपालकांना दिलासा दिला जात आहे. मात्र,६०-७० हजारांचा बैैल अथवा गाय दगावल्यास २५-३० हजार एवढा तुटपुंजा मोबदला दिला जातोे. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले आहेत. मोबदल्याच्या प्रस्तावासाठी पंचनामा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. मात्र,तहसीलदार,तलाठी,ग्रामसेवक या सरकारी अधिकाऱ्यांसमक्षच पंचनामा होणे अपेक्षित असून हे अधिकारी अनेकदा त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतात. परिणामी,पंचनाम्यासाठी मोठा विलंब होतो. त्यामुळे १४७ मोबदल्याचे प्रस्ताव रखडले आहेत. आजवर अनुदानाचे १८५ प्रस्ताव निकाली निघाले असून जवळपास ३५ लाखांपर्यंत नुकसानीचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरी