लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कच-यावर प्रकिया करण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांमध्ये वॉर्डावॉर्डांत यंत्रणा उभारावी या मुख्य अटीवर रविवारी सायंकाळी नारेगाव येथील शेतक-यांनी मागील तीन दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन मागे घेतले. सोमवारी सकाळी महापालिकेच्या गाड्या नियमितपणे नारेगाव कचरा डेपोवर कचरा टाकणार आहेत.झालर क्षेत्रातील गावक-यांनी एकत्र येऊन नारेगाव कचरा डेपोच्या बाजूला शुक्रवारपासून जोरदार आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर नारेगाव पचंक्रोशीतील शेतक-यांच्या आंदोलनामुळे महापालिकेची जोरदार कोंडी झाली होती. मनपा प्रशासन आणि पदाधिका-यांनी दोनदा शिष्टाई केल्यानंतरही आंदोलकांनी माघार घेतली नाही.शेवटी रविवारी दुपारी ४ वाजता विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आंदोलकांची भेट घेऊन महापालिकेला तीन महिन्यांची मुदत द्या, अशी गळ शेतक-यांना घातली. बागडे यांच्या शब्दाला मान देत पुंडलिक अंभोरे यांच्यासह सर्व आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी महापौर बापू घडमोडे यांनी तीन महिन्यांत प्रत्येक वॉर्डात कच-यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले.
कच-याची कोंडी अखेर फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:26 AM