औरंगाबाद : '' विना सहकार नही उद्धार'' या उक्तीनुसार सहकारक्षेत्र महाराष्ट्रात मार्गक्रमण करीत आहे. सहकार क्षेत्राला भक्कम करण्यासाठी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन उमेदवार अभिषेक जैस्वाल यांनी केले.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, औरंगाबाद समिती सदस्य निवडणूक बिगरशेती संस्थान या गटामधून ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणे, युवा शक्तीला प्राधान्य देऊन सहकारक्षेत्रात क्रांती घडविणे, बँकेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणे यासह अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. निवडणुकीत युवा उमेदवार सर्वांचे नेतृत्व करेल, असा विश्वास असल्याने मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद समिती सदस्य निवडणूक २१ मार्च रोजी होत आहे. या निवडणुकीत बिगरशेती संस्थान या गटातील 'मेणबत्ती' चिन्हावर मतदान करून मला विजयी करून सहकारक्षेत्रात बदल घडविण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन जैस्वाल यांनी केले आहे.