शिक्षकांची वेतनप्रक्रिया मुख्याध्यापक, शालार्थ तालुका मास्टर ट्रेनर, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग लेखा आस्थापना कर्मचारी, शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या स्तरावरील टप्प्यांतून वेतन प्रक्रिया पुढे जात असते. मात्र, कसलाही धाक न उरल्याने काही कर्मचाऱ्यांकडून यात प्रत्येक टप्प्यावर ठराविक दिवसांचा उशीर होत असल्याने दरवेळी वेतन उशिराने होते. हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी या प्रक्रियेतील जबाबदारी असलेल्या सर्वांवर कालबद्ध जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता असून, तातडीने असे आदेश काढण्याची मागणी शिक्षक सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्याकडे केली आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांचीही भेट घेऊन चर्चा केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी कळविले आहे.