शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

जीवन गुणवत्तेत शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 1:53 PM

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले अस्तिककुमार पाण्डेय यांच्या कामाचे कौतुककेंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणार

औरंगाबाद : जीवन गुणवत्तेत औरंगाबाद शहर देशात १३व्या स्थानी आले आहे. पुढच्या वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या परिश्रमामुळे हे साध्य झाले. शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक आनंदी कसे बनेल, यादृष्टीने भविष्यात काम करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे. या चांगल्या कामगिरीबद्दलची माहिती देण्यासाठी देसाई यांनी पाण्डेय यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. शहराने ६३व्या स्थानावरून झेप घेत ३४वे स्थान पटकावले आहे. शहराची ही चांगली प्रगती आहे. शिक्षण, आरोग्य आणि विकासकामामध्ये नजरेत भरणारी ही प्रगती ठरली आहे, असे देसाई म्हणाले. या शहराबद्दल मुख्यमंत्र्यांचा ममत्व भाव, आपुलकीची भावना यामुळेच शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. पाणी, कचरा, रस्ते हे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटी घेत विकासाचा संवाद हा कार्यक्रम घेतला. आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सूचना विचारात घेऊन शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम हाती घेतले.

महापालिकेच्या मेहनतीचे फळअखिल भारतीय पातळीवर महापालिकेच्या सेवांचा विचार मानांकन देताना करण्यात आला. आरोग्य, शिक्षण व इतर सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले तसेच मनपा प्रशासनाने प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांनी मनपा प्रशासक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले.

केंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणारकेंद्र शासनाने औरंगाबाद शहराला दिलेल्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये कोणकोणते निकष तपासण्यात आले. याचा बारीक अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील. केंद्राच्या सर्वेक्षणात नागरिक हा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समाधानावर बरेच काही अवलंबून आहे. पुढील वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका