छत्रपती संभाजीनगर : विकास आराखडा हा प्रत्येक शहराच्या विकासाचा आत्मा असतो. राज्यातील प्रमुख शहरांचे आराखडे वर्षानुवर्षे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विकासाला खीळ बसत आहे. राज्यातील १४ शहरांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी डीपी युनिटची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. परंतु, एकाही शहराचा विकास आराखडा अद्यापही तयार झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील अनेक डीपी युनिटला खासगी एजन्सीही मदतीसाठी दिल्या. त्यानंतरही वर्षानुवर्षे आराखडे रखडले आहेत. त्यामुळे शहरांचा विकास काेमात गेलाय. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अवघ्या २४ महिन्यांमध्ये जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्र करून एक नवीन विक्रम स्थापित केला आहे.
१४ शहरांचे आराखडेया पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा जमीन वापराचा नकाशा (ईएलयू) व प्रस्तावित जमीन वापराचा नकाशा (पीएलयू) तयार केला जातो. छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास आराखडा किमान १० वर्षांपूर्वीच तयार होणे अपेक्षित होते. त्याला बराच विलंब झाला. २०१४ मध्ये तयार झालेला विकास आराखडा वादग्रस्त ठरला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत आराखड्याचा वाद पोहोचला होता. राज्य शासनाने २०२१ मध्ये नवीन विकास आराखडा तयार करण्याची घोषणा करून जुन्या वादाला पूर्णविराम दिला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले. ऑगस्ट २०२३ मध्ये हे काम संपले. आराखडा तयार करण्यासाठी एका खासगी एजन्सीची नेमणूक केली होती. मात्र, या एजन्सीच्या सहकार्याची मनपाला गरजच पडली नाही. त्यामुळे मनपाचे १० कोटी रुपये वाचले. शहराचा विकास आराखडा कधी प्रसिद्ध होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
उशीर झाल्यास उपयोग काय?विकास आराखडा तयार करताना सद्य:स्थितीचा विचार केला जातो. जेव्हा आराखडा प्रकाशित होतो, तेव्हा परिस्थिती बरीच बदललेली असते. मुळात आराखड्याला विलंब होताच कामा नये. युद्धपातळीवर आराखडे तयार झाले तरच शहर विकासाला गती मिळते.-पुरुषोत्तम भापकर, निवृत्त सनदी अधिकारी
शहर -- डीपी युनिट स्थापन -- क्षेत्रफळठाणे -- डिसेंबर -- २०२० -- १२८ चौ. किमी.नागपूर -- मे -- २०१९ -- २२७ चौ. किमी.पिंपरी-चिंचवड -- जून -- २०१८ -- ०७७ चौ. किमी.कोल्हापूर -- ऑगस्ट -- २०१९ -- ०६६ चौ. किमी.अकोला -- जुलै -- २०१९ -- १०५ चौ. किमी.