सरपंच शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत राज्यमंत्री सत्तार यांची भेट घेऊन गावाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. रविवारी सत्तार यांनी देऊळगाव बाजार येथे विकास आढावा बैठक घेतली. यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरघोस निधी गावासाठी देणार असल्याचे आश्वासन दिले. यात आमठाणा ते वाकोद रस्ता, चारना मध्यम प्रकल्पातून पाइपलाइन, दोन लाख लीटर पाणी क्षमतेची टाकी, ग्रामपंचायत व तलाठी सज्जा कार्यालयासाठी इमारत या मुख्य कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील ११० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी अर्जुन गाढे, देविदास लोखंडे, मच्छिंद्र पाखरे, सुधाकर पाटील, अजीस बागवान, राहुल सपकाळ, उपसरपंच श्रीराम कुंटे, शैलेंद्र साळवे, गणेश गरुड, हरीश देशमुख, भगवान जंजाळ, अशोक सोमासे, श्यामधन चरावंडे, विठ्ठल कदम, दीपक सोनवणे, प्रा.डॉ. इरफान खान आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो :