ग्रामविकासात ग्रामसभांचे विशेष महत्त्व असून अनेक कामांना ग्रामसभेत ठेवूनच मंजुरी घ्यावी लागते. एका वर्षात चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत निवडणुका होऊन काही महिने उलटले तरी कोरोनामुळे अद्याप एकही ग्रामसभा न झाल्यामुळे अनेक निर्णय रखडले आहेत. ग्रामसभेच्या मंजुरीअभावी वार्षिक आराखडे वैयक्तिक लाभाची कामे १५ व्या वित्त आयोगातून गावातील विविध विकासकामे प्रलंबित आहेत. महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी संजीवनी असणारी पोखरा सारखी योजना ग्रामसभेविना बंद अवस्थेत आहे.
जिल्हाधिकारी यांनी प्रश्न मार्गी लावला
पिंपळदरी
गावातील सर्वच कामे ग्रामसभेविना रखडली आहेत. १५ व्या वित्त आयोगातून मंजूर कामे सुद्धा करण्यासाठी परवानगी नाही. लोकांनी मोठ्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले आहे. आमची इच्छा असून देखील कामे होत नाहीत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा पिंपळदरीचे उपसरपंच किशोर कळवत्रे यांनी व्यक्त केली.