लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण सोमवारी हजारो शिवभक्तांनी वैद्यनाथ मंदिरात रीघ लागली होती. महिलांनी जवसाची शिवमूठ वाहून व बिल्वपत्र अर्पण करुन वैद्यनाथ प्रभूचे दर्शन घेतले. पुरुषांपेक्षा महिलांची तोबा गर्दी झाली होती.रविवार पहाटेपासून वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून भाविक दाखल झाले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. तीन श्रावण सोमवारपेक्षा या सोमवारी जास्त गर्दी होती, असे देवस्थानचे सचिव राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.परळी शहर पोलिसांनी रविवारपासून मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आॅटोरिक्षा, ट्रॅक्स व इतर वाहनांची भक्तांना अडचण झाली नाही. सोमवारी काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेख शिवाचार्य महास्वामी यांनी दुपारी वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले. त्यांच्या येथील अनुष्ठानासही भक्तांची इतर राज्यातून येणाºया भक्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:55 PM