सिडको एन-१ परिसरातील राधाकृष्ण मंदिरात कार्तिकस्वामींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. येथे भाविकांनी सर्व नियम पाळत भगवंतांचे दर्शन घेतले. सायंकाळी भाविकांनी रांगा लावल्या होत्या; पण रात्री ८ वाजेनंतर भाविकांची गर्दी ओसरली होती. सर्वजण कार्तिकस्वामींना मोरपंख अर्पण करीत होते. अनेक जण नवीन नोटा भगवंताच्या पायाला लावून आपल्या पाकीटमध्ये ठेवत होते.
भाविकांनी घेतले कार्तिकस्वामींचे दर्शन
By | Published: December 02, 2020 4:06 AM