लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे विशेष पोलीस अधिकारी आणि दंगासदृश परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणा-या ड्रोन कॅमे-यांचा अहवाल राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालयाने मागवला आहे.वाढती गुन्हेगारी, व्हीआयपींचे दौरे, निवडणुका, विविध राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलने यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील कामांचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत पोलिसांची संख्या मात्र वाढत नाही. यावर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी विशेष पोलीस अधिका-यांची नेमणूक आणि ड्रोन कॅमेरा हा रामबाण पर्याय समोर आणला आहे.पोलीस यंत्रणेला अत्यंत उपयुक्त अशा या विशेष पोलीस अधिकाºयांच्या उपक्र माला औरंगाबादेतून सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले.या उपक्रमाचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाने पत्र पाठवून पोलीस आयुक्तालयांकडून मागविला आहे. शहर आयुक्तालयात १ हजार १०० विशेष पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्यात आली. यात आणखी ४००० विशेष पोलीस अधिका-यांची भर पडणारआहे.आयुक्तालयाकडे शहरातील १८ हजार नागरिकांनी विशेष पोलीस अधिकारी होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जाची छाननी सुरू करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.ड्रोन कॅमे-यांच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणूक, बकरी ईद, नवरात्रोत्सव बंदोबस्तावर नजर ठेवण्यात आली. विशेष पोलीस अधिकारी आणि ड्रोन कॅमे-यांमुळे शहर पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यात मदत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.
डीजी कार्यालयाने मागवला ड्रोन, एसपीओचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:55 PM