शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शांतीदूतापुढे लाखो नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:43 AM

शांतीदूताच्या वैभवशाली बुद्धलेणी, धम्मभूमीला शनिवारी नागपूरच्या प्रति दीक्षाभूमीचेच स्वरूप आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शांतीदूताच्या वैभवशाली बुद्धलेणी, धम्मभूमीला शनिवारी नागपूरच्या प्रति दीक्षाभूमीचेच स्वरूप आले. मराठवाड्यातील आठही जिल्हे, खान्देशासह नगरमधूनही लाखो उपासक-उपासिका ‘जब तक सूरज चाँद रहेगा- बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणा देत येत होते. सकाळी सात वाजता सुरू झालेला हा धम्म सोहळा रात्री बारा वाजले तरी सुरूच होता.६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त धम्मध्वजारोहण व बुद्धवंदनेने सकाळी सोहळ्यास प्रारंभ झाला. या परिसरात तथागताच्या शेकडो मूर्ती स्थापित आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी बुद्धवंदनेचा मंगलमय सूर दिवसभर घुमत होता. दुपारपर्यंत सामान्य असलेली गर्दी तीन वाजेनंतर मात्र प्रचंड वाढली. त्यामुळे पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वाहने पुढे नेण्यास बंदी केली. पुढे पायी चालणेही अवघड होईल एवढी गर्दी झाली होती. पांढरे शुभ्र वस्त्र, डोईवर निळा फेटा किंवा गमच्या, हाती पंचशील झेंडा घेऊन आबालवृद्ध घोषणा देत होते. अनेक लहान-लहान गट रस्त्याने बुद्धवंदना म्हणत पुढे सरकत होते. त्यामुळे वातावरण मंगलमय झाले होते. तर विद्यापीठाचा हिरवाकंच परिसर, त्यात जागोजागी भरलेले पाण्याचे तळे जनसागराचा उत्साह वाढवीत होते.बुद्धलेणीच्या पायथ्याशी विहारातील भव्य बुद्धमूर्तीपुढे लीन होऊन अपार शांतीचा अनुभव घेतल्यानंतर येथे उभारलेल्या शामियान्यात उपासक बसत होते. मंचावर भदन्त विशुद्धानंद बोधी, प्रा. भंते सत्यपाल, भदन्त सुदत्त बोधी, गुणरत्न महाथेरो, भदन्त नागसेन यांच्यासह भिक्खू व श्रामणेर संघ विराजमान होता. या उपासक- उपासिकांना भिक्खू संघातर्फे धम्मदीक्षा दिली जात होती. सोबतच कलावंतांचा संच बुद्ध-भीमगीते गाऊन प्रबोधन करीत होता. या वैचारिक प्रबोधनाला टाळ्यांसह साधूकाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दिवसभर अशी जुगलबंदी रंगत होती. दिवसभरात पाच लाखांहून अधिक उपासक- उपासिका धम्मसोहळ्यास आल्याचे भदन्त सुदत्त यांनी सांगितले.महापौर, आमदार, आयुक्तांची उपस्थितीमहापौर बापू घडमोडे, आमदार सुभाष झांबड, आमदार इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिवसभरात या सोहळ्यास भेट दिली. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष विजय मगरे, कार्याध्यक्ष वसंत सातदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छाया सोहळ्यास लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलत मोरे यांनी मंचावरून राजेंद्र दर्डा यांच्या शुभेच्छा उपस्थिताना कळविल्या. ते म्हणाले, राजेंद्र दर्डा यांना लेणीवर आज यायचे होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी तमाम बौद्ध उपासक-उपासिकांना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा कळविल्या आहेत.