शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
3
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
4
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
5
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
6
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
7
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
8
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
9
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
10
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
11
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
12
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
13
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
15
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
16
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
17
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
18
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
19
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
20
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत

धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:24 PM

तब्बल दीड तासानंतर दुसरे इंजिन झाले रवाना

ठळक मुद्देमनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबविण्यात आले दुपारी १२ च्या दरम्यान दुसरे इंजिन रवाना करण्यात आले

बदनापूर/औरंगाबाद : बदनापूरहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन करमाड येथे अचानक बंद पडले.  सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान अचानक मोठा आवाज होऊन हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे सुमारे दोन तास प्रवास्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस बंद पडल्याने मनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबवून ठेवण्यात आली.

सकाळी साडेनऊ ला बदनापूरहुन मनमाडकडे जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस आज करमाडजवळ गेल्यानंतर तिचे इंजिन अचानक फेल झाले त्यामुळे हजारो प्रवासी मधेच अडकले. त्यानंतर औरंगाबादहून मनमाड-काचीगुडा ही रेल्वे बदनापूरकडे जात असताना तिला चिकलठाणा येथे थांबविण्यात आले. या गाडीचे इंजिन करमाडकडे हायकोर्टसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे मनमाड काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेतील प्रवाशीही चिकलठाणा रेल्वे स्थानकावर तासनतास अडकले. सुमारे बारा वाजेच्या सुमारास हायकोर्ट एक्सप्रेस चिकलठाणा येथे आली होती. मात्र दोन तास ताटकळल्याने या दोन्ही रेल्वेतील हजारो रेल्वे प्रवाशांची मोठी दयनीय अवस्था झाली होती. 

मनमाड-काचीगुडा या रेल्वेतील अनेक प्रवासी बारा वाजेच्या सुमारास आलेल्या सचखंड एक्सप्रेसमध्ये बसुन पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र मनमाड काचीगुडा हि रेल्वे चिकलठाणा स्थानकावरच उभी होती. या पॅसेंजरमधून प्रवास करणारे दिपक मुंडलीक म्हणाले की, रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभारामुळे प्रवास्यांचे हाल झाले. ही पॅसेंजर चिकलठाणामध्ये  उभी करण्यापेक्षा करमाडपर्यंत आणली असती तर प्रवास्यांना पुढे अन्य वाहनांनी जाता आले असते त्यांचा वेळही वाचला असता.

मनमाड- काचीगुडा पॅसेंजरसाठी जालन्याहून इंजिन रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, करमाडजवळ  धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान अचानक बंद पडले. या रेल्वेसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनमाड- काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन पाठविण्यात आले आहे. इंजिन करमाड रेल्वे स्टेशनच्या दिशेन रवाना झाले असून या इंजिनच्या सहाय्याने धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस औरंगाबादकडे आणण्यात येईल. या दरम्यान  मनमाड- काचीगुडा पॅसेंजर चिखलठाणा रेल्वेस्टेशनवर थांबवून ठेवली आहे. या पॅसेंजर गाडीसाठी जालना येथून दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, इंजीनन काढल्याने मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रेल्वेतील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस चिखलठाणा येथे अडवून ठेवली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन