औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड गाव आहे. चार जिल्ह्यांच्या पायथ्याशी असलेल्या पाचोडला दहा हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. पाचोड गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे शंभर गावांचा दळणवळणाशी संबंध पाचोडशी येतो. रविवारी येथे मोठा आठवडी बाजार भरत असतो. बाजारासाठी मराठवाड्यातून व्यापारी पाचोडला येत असतात. अडत बाजार व जनावरांचा बाजार मराठवाड्यात नावारूपाला आला आहे; परंतु कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद आहेत. जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रीनारायण भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पाचोड गावात धरणे आंदोलन करण्यात आले. आठवडी बाजार लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी निवेदन दिले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रीनारायण भुमरे, ॲड. रणवीर नरवडे, रणजित नरवडे, पवन गटकाळ, निखिल काळे, भागवत भुमरे, दादासाहेब भुमरे आदी हजर होते.