शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांची शहरात धूम, ३ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:12 PM

लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.

ठळक मुद्देवृद्ध महिला चोरट्यांचे लक्ष्य : बीड बायपास, सेव्हन हिल आणि सिडकोत घडल्या घटना

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.पहिली घटनाबीड बायपास परिसरातील गोपीकिसन रामकिसन राठी यांच्या आई वत्सलाबाई (वय ८०) या बुधवारी सकाळी ६.३० वाजता झोपेतून उठल्या. त्या घराच्या अंगणात तोंड धूत होत्या. तेव्हा लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोन जण आले. दुचाकीवरील एक जण खाली उतरला आणि राठी यांच्या घराशेजारील किराणा दुकानात गेला. त्याने पाण्याची बाटली विकत घेतली. पाणी पिले. तोपर्यंत दुचाकीस्वार त्याची मोटारसायकल पुढे जाऊन वळवून आला. त्याच्या साथीदाराने आणखी एक पाण्याची बाटली मागितली. याचवेळी त्या चोरट्याने वत्सलाबाई यांच्या पाठीला स्पर्श केला. वत्सलाबाई मागे वळून पाहत असतानाच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसका देत तोडली आणि तो साथीदारासह मोटारसायकलवर बसून निघून गेला. वत्सलाबाई यांनी चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे वेगाने तेथून पळून गेले. या घटनेप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.घटना दुसरीदुसरी घटना जळगाव रोडलगतच्या सर्व्हिस रोडवरील विजयश्री कॉलनीच्या कॉर्नरवर सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास घडली. बायपासवर वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्यानंतर चोरट्यांनी जळगाव रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडने पायी जाणाºया ७२ वर्षीय पुष्पावती गोपालराव गंटा (रा. सत्यमनगर, सिडको एन-५) यांना गाठले. पुष्पावती सर्व्हिस रोडने एकट्याच जात होत्या. त्या विजयश्री कॉलनी कॉर्नरवर असताना लाल रंगाच्या दुचाकीने आलेले दोन चोरटे अचानक मागून आले आणि त्यांच्याजवळ येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेल्या एका चोरट्याने पुष्पावती यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रास हिसका दिला. प्रसंगावधान राखून पुष्पावती यांनी सोनसाखळी पकडली. त्यामुळे माळेतील दोन वाट्या त्यांच्या हातात राहिल्या आणि चोरटे दोन पदरी सोनसाखळी घेऊन सुसाट निघून गेले. पुष्पावती यांनी चोर, चोर म्हणून मदतीसाठी आरडाओरड केली, तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पुष्पावती यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसChain Snatchingसोनसाखळी चोरी