सावखेडा : गंगापूर तालुक्यातील मांगेगाव ग्रुप-ग्रामपंचायतीच्या संरपच लक्ष्मीबाई रोडगे यांच्या घरासमोर मांगेगाव ग्रामस्थांनी नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने शनिवारी ढोलताशा मोर्चा काढून आंदोलन केले. तर सरपंचांना धारेवर धरीत त्वरित समस्या दूर करण्यात यावी, अशी मागणी केली.
मांगेगाव, महालक्ष्मी खेडा, वझर ही गावे जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेली आहेत. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावासाठी दक्षिण गंगा गोदावरी नदीवर जायकवाडी जलाशय आहे. येथून गावाला १५ एचपी पंपाद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील पंधरा दिवसापासून पंप जळाल्याने गावाला पिण्याचे पाणी नळाला येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या मांगेगाव ग्रामस्थांनी महालक्ष्मी खेडा येथील सरपंचांच्या घरावर ढोलताशा मोर्चा काढला. त्वरित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली.
पावसाने चिखल झाल्याने पंप बसविण्यासाठी अडचण येत आहे. त्या ठिकाणी जेसीबीद्वारे मोटर काढून नंतर जेसीबीने पंप बसविण्यात येत आहे. रविवार(दि.२५)पासून गावात सुरळीत पाणीपुरवठा होईल.
- लक्ष्मीबाई रोडगे, सरपंच.
----
फोटो फाईल मॅनेजरमधून घ्यावा.