-----------------------
शिक्षिका पदमसेना नागदेवे यांना निरोप
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद शाळेतील पदवीधर शिक्षिका पदमसेना नागदेवे या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना मंगळवारी (दि.३०) निरोप देण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय मुख्याध्यापक प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, विद्या सोनोने, अनिता राठोड आदींची उपस्थिती होती.
----------------------------
द्वारकानगरीतून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरातील द्वारकानगरीतून दुचाकी लांबविणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषिकेश अवधूत क्षीरसागर यांनी २२ मार्चला रात्री ८ वाजेच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एम.एच.२०, एफ.एच.७२७६) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
-----------------------
ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीकडे कानाडोळा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील साईप्रसाद अपार्टमेंट व सूर्यवंशीनगरातील ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. जिजाऊ चौक ते ए. एस. क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी तुंबल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या सोसायटीतील नागरिक व सिडको प्रशासन ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करीत असल्याने नागरिकांत असंतोष आहे.
------------------------------
रांजणगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
वाळूज महानगर : रांजणगाव फाटा ते कमळापूर या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर वर्दळीमुळे सर्वत्र धूळ उडते. एका बाजूने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
--------------------------