शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘धुंद’ मुख्याध्यापकाचा शाळेत धिंगाणा

By admin | Published: June 19, 2017 11:40 PM

माजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यु.आर. धन्वे याने थोडी लावून शाळेतच ‘धिंगाना घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील सिमरी पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक यु.आर. धन्वे याने थोडी लावून शाळेतच ‘धिंगाना घातला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी शाळेत येऊन त्याला चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच पोलीस व गटविकास अधिकाऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.सिमरी पारगाव येथे आठवीपर्यंत जि.प.ची शाळा आहे. या ठिकाणी आठ शिक्षक कार्यरत आहेत. यु.आर. धन्वे हा या शाळेत वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. अनेकवेळा तो शाळेत थोडी ‘लावून’च आल्याचे विद्यार्थी सांगतात. याबाबत केंद्रप्रमुखांच्या कानावर घातला. परंतु काहीच उपयोग झाला नाही. १५ जूनपासून शाळा सुरू होताच मुख्याध्यापक धन्वे यांनी पुन्हा आपले कारनामे दाखवायला सुरूवात केली. सोमवारीही ते सकाळी थोडी ‘लावून’च शाळेत आले होते. यावेळी त्यांनी साहित्याची तोडफोड करण्यासह धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली आणि परिस्थितीची खात्री करून धन्वे यांना चांगलाच चोप दिला. तसेच त्याला वर्गखोलीत कोंडून ठेवले. घटनेची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि माजलगावचे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण व पं.स.उपसभापती सुशील सोळंके यांनी धाव घेतली. याचा पंचनामाही झाला आहे.