शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार !

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 28, 2024 5:51 PM

तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल.

छत्रपती संभाजीनगर : लग्नात नवरीला सोन्याचे दागिने व नवरदेवाला अंगठी घ्यावीच लागते. आजघडीला १० ग्रॅम सोने ६६८०० रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. येत्या महिना-दीड महिन्यात हेच सोने ७० हजारांपर्यंत जाऊन पोहोचेल, अशी शक्यता सराफा व्यापारी व्यक्त करीत आहेत. तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल.

जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव ६४२०० रुपये प्रति १० ग्रॅम विकत होते. सध्या ६६८०० रुपयांना विकत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याचा भाव ४६०० यांनी वाढला आहे.

वर्षभरात किती हजारांनी वाढला सोन्याचा भावमहिना किंमत (१० ग्रॅम)२०२३१) मार्च --- ५९१०० रुपये२) एप्रिल --- ६०५०० रुपये३) मे --- ६०९०० रुपये४) जून--- ५९०५५ रुपये५) जुलै----६०५०० रुपये६) ऑगस्ट--- ६०४०० रुपये७) सप्टेंबर-- ५८५०० रुपये३) का वाढला सोन्याचा भाव? (बॉक्स)८) ऑक्टोबर ----६१८०० रुपये९) नोव्हेंबर---- ६३५०० रुपये१०) डिसेंबर ६४२०० रुपये

२०२४११) जानेवारी (२०२४)---६४२०० रुपये१२) फेब्रुवारी--- ६३५०० रुपये१३) १५ मार्च---६७५०० रुपये

महिना ते दीड महिन्यात सोन्याचा भाव ७० हजारांवरआंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचे भाव कमी होत आहेत. सर्व देशांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. चीनपासून ते रशियापर्यंत सर्व देश त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवीत आहेत. त्यात भारतात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. अशी परिस्थिती राहिली तर येत्या महिना ते दीड महिन्यात सोन्याचा भाव ७० हजारांवर जाऊन पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको.- गिरधर जालनावाला, ज्वेलर्स

मागील वर्षभरात सोने ७७०० रुपयांनी वधारलेमागील वर्षभरात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ७७०० रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूकही फायदेशीर मानली जात आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करून तिजोरीत ठेवण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. 

टॅग्स :GoldसोनंAurangabadऔरंगाबादmarriageलग्न