शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Video: राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्री शिंदेंनी भर पत्रपरिषदेत विचारणा करत साधला निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 3:42 PM

भर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक केली विचारणा...

छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रपरिषदेला जाणार असे म्हटल्याने जोरदार घमासान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, खा. राऊत यांनी पास देखील घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिल्याने याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आज पत्रपरिषदेत खा. संजय राऊत हे अनुपस्थित होते. यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी भर पत्रकार परिषदेत अचानकपणे, राऊत आले नाही का? अशी विचारणा करत टोला लगावला.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रपरिषद घेतली. यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा केली. विविध निर्णय घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक, ''राऊत आले नाहीत का ? अशी विचारणा केली. त्यानंतर विकास राऊत, तुमचे लोकमतचे आहेत न विकास राऊत'' असे पुढे म्हणत खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. मात्र, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेची चर्चा सुरु झाली.

संजय राऊत काय म्हणाले होतेमला विचारण्यात आले, तुम्ही जाणार का? तर मी म्हंटले, माझी इच्छा आहे, पत्रकारांनी प्रश्न विचारावेत. मला संधी मिळाली तर मी विचारेल. मात्र, मी जाणार म्हंटल्या पासून पोलिसांनी माझ्याशी संपर्क केला. सर्व पोलीस बंदोबस्त पत्रकार परिषदेकडे लावला. मी वार्ताहर आहे, संपादक आहे. राज्यातील सर्वात जेष्ठ संपादक आहे, माझी इच्छा झाली तर मी जाईल, पण मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नकोय, असा खुलासाही खासदार राउत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबाद