बीड : जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा वाढविण्यासाठी आता केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर होणार आहे. यामाध्यमातून मोठ्या शहरांच्या धर्तीवर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोषण आहार अधिक पौष्टिक बनविला जाणार आहे. शिवाय स्वयंपाकगृहांमध्येही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्र्थ्यांना मोफत पोषण आहार दिला जातो. यात मूग, मटकी, भात, बिस्किटे दिले जातात. पालघर, भिवंडी या मोठ्या शहरांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी केंद्रीय स्वयंपाकगृह स्थापन करुन विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार दिला होता. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीला चालना देण्यासाठी विस्तार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधून स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन स्वयंपाकगृह व दर्जेदार आहार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांकडूनच निधीची तरतूद केली जाईल. सध्या शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी ‘कुकींग कॉस्ट’ अंतर्गत शासनाकडून निर्धारित केलेल्या दराने प्रतीविद्यार्थी निधी दिला जातो. मात्र, आता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीतून आहारामध्येही सुधारणा केली जाणार आहे. यामध्ये फळे, दूध व प्रथिनेयुक्त आहार देण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी गोविंद कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पत्र पाठविले आहे. या पत्रावरुन कार्यवाही करण्यास शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. किचनशेड होणार अत्याधुनिक केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीअंतर्गत केवळ पौष्टिक आहार पुरविला जाणार आहे, असे नाही तर स्वयंपाकगृहाचे देखील रुपडे पालटण्यात येईल. किचन शेडमध्ये स्वच्छ पाणी, धान्य साठविण्यासाठी व्यवस्था असेल. विद्यार्थ्यांना ताजा व चवदार आहार उपलब्ध करुन दिला जाणार आहे़ (प्रतिनिधी) केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे अधिक पौष्टिक आहार भेटणार आहे. ४शिक्षण विभागाच्या पत्रावर कार्यवाही सुरु आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने लवकरच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात येईल. ४स्वयंसेवी संस्थांची नावे येताच ती वरिष्ठ कार्यालयास कळवू असे, शालेय पोषण आहार विभागातील लिपीक गणेश सारुक यांनी सांगितले. ४केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली जिल्ह्यामध्ये यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले़हजार ९०१ इतक्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. १ ते ८ इयत्तेचे विद्यार्थी लाभ घेतात.