शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

इथे वेगळेच टशन ! गुलाल शिवसेनेचाच; भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 4:20 PM

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल १६३० मतांची आघाडी घेऊन या प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्चस्व कायम ठेवले.

सिल्लोड : सिल्लोड न.प.च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार फातमाबी जब्बारखान पठाण यांचा १६३० मतांनी विजय झाला. तर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेच्या उमेदवार फातमाबी यांना २०१९ मते मिळाली. वंचित आघाडीचा उमेदवार ३८९ मते घेऊन दोन नंबरला होता, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. काँग्रेस व राष्ट्रवादीला सन्मानजनक आकडासुद्धा पार करता आला नाही.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या पोटनिवडणुकीत तब्बल १६३० मतांची आघाडी घेऊन या प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. पैकी ५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. शिवसेनेचा सिल्लोडमध्ये हा ऐतिहासिक विजय झाला. भाजपसह इतर पक्षाच्या उमेदवारांना या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी उमेदवाराची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, आमेर शेख, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, रउफ बागवान, मनोज झंवर, शेख मोहसीन, विठ्ठल सपकाळ, मतीन देशमुख, अकिल देशमुख, शंकरराव खांडवे, अमृत पटेल, रईस मुजावर, जुम्माखा पठाण, सुधाकर पाटील, शेख बाबर आदी उपस्थित होते.

दोन नंबरवर वंचित बहुजन आघाडीशिवोनेच्या पठाण फातमाबी जब्बार खान २०१९, वंचितच्या पठाण कैसरबी बनेखा ३८९, भाजपच्या मिसाळ छायाबाई मोतीराम २१०, शेख आसमा मुख्तार ७९, काँग्रेसच्या शेख जकीया अकबर ५३, राष्ट्रवादीच्या शेख फरिदा बेगम २६, पठाण रईसाबी चांदखा ९ तर नोटाला १४ मते पडली. या निवडणुकीत एकूण २७९९ मतदान झाले असून त्यापैकी शिवसेनेच्या उमेदवाराला तब्बल २०१९ तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ३८९ मतदान घेऊन दोन क्रमांकावर राहिला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी