औरंगाबाद : आॅगस्ट महिन्यात मराठा क्रांती मोर्चादरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीचा परिणाम डीएमआयसी आणि आॅरिक सिटीमधील गुंतवणुकीवर किती प्रमाणात झाला हे सांगणे अवघड आहे. परंतु सकारात्मक दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून या शहरातील क्षमता आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आॅरिकचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटील म्हणाले, डीएमआयसी, आॅरिकवर वाळूजमधील दंगलीचा थेट परिणाम कसा आणि किती झाला हे सांगता येणार नाही. मात्र कुठल्याही शहरात दंगलीसारखी घटना घडली की, त्याची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल मीडियामुळे जाते. उद्योजक गुंतवणुकीबाबत फार संवेदनशील असतात. आम्ही मार्केटिंगचे काम करीत असल्यामुळे ते जाणवत आहे. गुंतवणूकदार येताना सरकारी धोरण, कामगार, तांत्रिक कामगार, दळणवळण, उत्पादनावर स्थानिक दंगलीचा होणारा परिणाम, याचा विचार उद्योजक करतात, त्यामुळे परिणाम होतातच.
आज विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी पाटील यांच्यासोबत शेंद्रा-बिडकीनची पाहणी केली. स्थानिक वातावरण उद्योजकांसाठी पोषक असावे, यासाठी ते एका सेलची स्थापना करीत आहेत. पोलीस, जिल्हा प्रशासनाचा सेल असेल. त्याचा नियमित आढावा घेण्यात येईल. वाळूजमधील दंगलीच्या घटनेचा परिणाम होणार नाही, याची माहिती सकारात्मकरीत्या माहिती प्रदर्शन, परिषदांमध्ये एमआयडीसी मांडत आहे.
सहा ते सात नवीन कंपन्यांशी चर्चाह्योसंगने १०० पैकी २५ एकर जागेत काम सुरू केले आहे. शिवाय आणखी काही रशियन आणि जपानी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये स्पेशालाईज स्टील, फार्मास्युटिकल्स कंपन्यांचा समावेश आहे. बिडकीनचे अजून मार्केटिंग सुरू केलेले नाही. सध्या ३५ टक्के काम पूर्ण होत आले आहे. संरक्षण खात्यातील काही उद्योगांशी संपर्क सुरू असून, रोजगाराभिमुख गुंतवणूकदार यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आयटी कंपन्यांसाठी डीसी रूल शिथिलआयटी कंपन्यांसाठी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल शिथिल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांना जागा आणि ग्राहक उपलब्ध होतील, याबाबत आॅरिकने आश्वासन दिले आहे. अॅमेझॉन, एअरटेल, एचपी, मंत्रा डाटा सेंटरसाठी जागा पाहत आहे. दोन डाटा सेंटर येथे येतील. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. तसेच आॅईल डेपो जागा आरक्षित केली आहे.