लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हा राज्यात चौथ्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. १५ आॅगस्टपासून जिल्ह्यात प्रत्येक शेतकºयास डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.एक आॅगस्टला जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.जिल्ह्यातील दोन लाख ४४ हजार ५४१ सातबारांपैकी दोन लाख ४३ हजार ६३० सातबारांची ९९. ६३ टक्के तपासणी पूर्ण झाली आहे. या कामात जालना राज्यात चौथ्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. ९५३ गावांपैकी ९५२ गावांमध्ये चावडी वाचनाचे काम पूर्ण झाले असून, या दरम्यान आढळून आलेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत आहे. १५ आॅगस्टला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संगणकीकृत सातबरा वितरणाची सुरुवात केली जाणार आहे.शेतकºयांना आपले सरकार पोर्टलवर २३ रुपयांमध्ये आॅनलाइन सातबार उपलब्ध होईल. डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत मे २०१६ पासून आठही तालुके आॅनलाइन करण्यात आले आहेत. आॅनलाइन झाल्यापासून सतरा हजार ९०० नोंदणीकृत व्यवहार करण्यात आले असून, पैकी दहा हजार फेरफार आॅनलाइन मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात दीडशे कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिली. या वेळी रवींद्र पडूळकर, अमोल महाजन आदींची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यदिनापासून मिळणार डिजिटल सातबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:33 AM