बीड : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी जिल्हा दौऱ्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव व माजलगाव तालुक्यातील वारूळा तांड्यालाही भेट दिली.बागंपिपळगाव येथे हंडाभर पाण्यासाठी राजश्री नामदेव कांबळे या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन विखे पाटलांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा संदर्भात तात्काळ उपायोजना करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या.माजीमंत्री अशोक पाटील, माजी आ. सिराजोद्दीन देशमुख, प्रा. सर्जेराव काळे, अशोक हिंगे, राजेसाहेब देशमुख, सुरेश हात्ते, नारायण होके, मनीषा पांडुळे, विनायक शिंदे, राजेसाहेब देशमुख, प्रा. सुशीला मोराळे, शहादेव हिंदोळे, अॅड. सुरेश हात्ते, सय्यद सिराज, श्रीनिवास बेदरे आदी उपस्थित होते.छावणीला भेटविखे पाटील यांनी दुपारी बीड तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील गुरांच्या छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी पशुपालकांसोबत चर्चा केली. तेथेच त्यांनी जेवण घेतले. नाळवंडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विखे पाटलांनी साधला थेट संवाद
By admin | Published: March 02, 2016 10:58 PM