गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेल्या रामेश्वर कन्हय्यालाल मुंदडा यांनी वैजापूर येथील सत्र न्यायालयात दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यात त्यांच्यातर्फे वकिलांनी बाजू मांडताना आडिट रिपोर्टमध्ये रकमेचे वाटप योग्यरितीने झालेले असल्याचे सांगून व मी आजारी असल्याच्या कारणाने जामीन देण्याबाबत या कारणासाठी जामीन अर्ज दाखल केला होता; परंतुु न्यायालयाने यासंदर्भात अगोदरच सुनावणी झालेली असून, यात आपला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. दुसऱ्यांदा जामीनासाठी हायकोर्टात न जाता याच कोर्टात दाखल करण्याचे ठोस कारण काय, अशी विचारणा करून रामेश्वर मुंदडा यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन नामंजूर केला असून, ११ तारखेला पोलिसांचे म्हणणे मागवून पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. मुंदडा यांच्यावतीने ॲड. एस.के. बरलोटा यांनी काम पाहिले.
कारखाना अपहार प्रकरणात संचालकाचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:05 AM