लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगाव नाका : येथील कनेरगाव नाका व मोप गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्ध ८ विरुद्ध ३ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.या ग्रा.पं.चे सदस्य १३ होते. त्यापैकी दोन सदस्य जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत निवडून आल्याने पदे रिक्त व सध्या सदस्य ११ आहेत. सरपंच गटाचे ८ सदस्य होते; परंतु सरपंच यांनी सदस्यांना विश्वासात न घेतल्याने २३ रोजी विद्यमान सरपंच सविता कांबळे यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव हिंगोली तहसीलदारांकडे केला. यावर चर्चेसाठी २८ नोव्हेंबर रोजी ग्रा.पं.त बैठक झाली. ठरावावर सरपंचाविरूद्ध ८ तर बाजूने ३ मते मिळाली. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी अविश्वास संमत झाल्याचे सांगितले.यावेळी नायब तहसीलदार एस.जी. खोकले, मंडळ अधिकारी शे. अल्लाबक्ष, ग्रामविकास अधिकारी घुगरे पाटील, तलाठी पी.डी. इंगोले, सहायक पोलीस सोनुने, जमादार शाम खुळे, मोहन धाबे, बांगर, महाल्ले यावेळी उपस्थित होते.
सरपंचावर अविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:11 AM