एक कोटीहून अधिक विद्यार्थी घेणार ऑनलाईन सहभाग
औरंगाबाद : डिस्कव्हरी प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘बायजू’स व ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित भारतातील सर्वात प्रसिद्ध व प्रतिष्ठित नॅशनल लेव्हल आंतरशालेय ऑनलाईन परीक्षेच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वाला शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मागील तीन वर्षांपासून नॅशनल लेव्हलवर प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात येत आहे. यात विविध राज्यांतून विद्यार्थी सहभागी होत असतात. यामुळे चौथ्या पर्वाच्या परीक्षेचेही ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. तिसरी ते दहावीचे विद्यार्थी घरबसल्या या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. शालेय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यात आंतरशालेय प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी व आठवी ते दहावी असे तीन गटात विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
अशी होईल स्पर्धा...
१. शालेयस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषामध्ये एकापेक्षा अधिक पर्याय असलेल्या २० प्रश्नांची उत्तरे ३० मिनिटात पूर्ण करावी लागणार आहेत. शाळेमधून प्रत्येक गटातील एक विद्यार्थी राज्यस्तरीय प्रवेशासाठी पात्र होऊ शकेल.
२. राज्यस्तरावर एकापेक्षा अधिक पर्याय असलेल्या प्रश्नमंजुषामधून सर्वोत्कृष्ट दोन विद्यार्थांना राष्ट्रीय स्तरासाठी निवडण्यात येईल.
३. प्रत्येक राज्यातील विजेत्यांमध्ये होणारी प्रश्नमंजुषा डिस्कव्हरी वाहिनीवर भारतात प्रक्षेपित केली जाणार आहे. मुंबई येथे डिस्कव्हरी वाहिनीच्या स्टुडिओमध्ये चित्रित केली जाईल.
विजेत्यांवर बक्षिसांचा होईल वर्षाव...
- राष्ट्रीय स्तरावर प्रथम तीन विजेते शालेय संघ व मुख्याध्यापकांसोबत नासा ट्रिप व १० लाखांचे रोख बक्षीस, शाळा व विद्यार्थांचा विशेष सन्मान व ‘बायजू’स द लर्निंग ॲप एक वर्षाचे प्रशिक्षण मोफत जिंकण्याची संधी राहील.
- शालेयस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र, रुपये ५००० किमतीची ‘बायजू’स कोर्ससाठी शिष्यवृत्ती, ‘बायजू’स ॲपवर ६० दिवसांचा कोर्स मोफत दिला जाणार आहे.
- विद्यार्थांना प्रश्नमंजुषावर आधारित विचार कौशल्य, कमकुवत व समृद्ध बाजू आणि योग्यतेचे मूल्यांकन दिले जाणार आहे.
- डिस्कव्हरी प्रस्तुत, पॉवर्ड बाय ‘बायजू’स व ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित आंतरशालेय राष्ट्रीयस्तरीय प्रश्नमंजुषा २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ॲप डाऊनलोड करता येईल.
- सुरुवातीला सराव प्रश्नावली सोडवून प्रमुख प्रश्नावली घरबसल्या सोडवायची आहे.
----
अँड्राॅईड मोबाईलसाठी
https://byjudssl.app.link/downloadapp
आयओएस मोबाईलसाठी
https://byjudssl.app.link/downloadapp
अधिक माहितीसाठी संपर्क
९६७३५९५५९५/९८५०४०६०१७
---
सर्व मुलांना त्यांच्या कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी इतके उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ‘बायजू’स एक शानदार काम करत आहे. ‘बायजू’स च्या टीमचे खूप आभार.
- सीमा दत्ता, प्राचार्या, सेंट मिरा हायस्कूल, औरंगाबाद
(फोटो सोडले आहेत)
---
गेल्या तीन वर्षांपासून आमचे विद्यार्थी ‘लोकमत’ आणि ‘बायजू’स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या क्विझमध्ये भाग घेत आहेत. विद्यार्थ्यांना विचार करणार्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी हा एक छान अनुभव आहे.
- मनीषा नाथ, प्राचार्या, जिगीशा इंटरनॅशनल स्कूल, औरंगाबाद.
(फोटो सोडले आहेत)
---