वाळूज महानगर: वाळूज येथील राजर्षी शाहु महाविद्यालयात कृषी विषयक चर्चासत्राचे नुकतेच आयोजन केले होते. यात तज्ज्ञांनी एकविसाव्या शतकातील कृषी क्षेत्र समस्या व उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.अशोक देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.निशिकांत आलटे तर प्रमूख पाहुणे म्हणूून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य प्रा.डॉ.राजेश करपे हे होते.
प्रा.देशमाने म्हणाले की, शासनाच्या उदासीन धोरणामुळेच कृषी क्षेत्राची पिछेहाट होत चालली असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. कृषी क्षेत्राशा चालना देऊन उत्पादित मालाला हमीभाव देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.करपे यांनी शिवकालीन शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतकºयाविषयी असलेले धोरण या विषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात विविध राज्यांतून आलेल्या संशोधक, प्राध्यापक यांनी आपले मत मांडले. चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रा.डॉ.शंकर अंधारे, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्राजक्ती वाघ तर आभार प्रा.डॉ.विश्वनाथ कोकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.मोहन सौंदर्य, प्रा.रेखा वाघ, प्रा.गौतम कांबळे, प्रा. वाय.ई.भालेराव, प्रा.शितल बियाणी, प्रा.करुणा कदम आदींची उपस्थिती होती.