औरंगाबाद : कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने बुधवारपर्यंत काम बंद आंदोलन केले. गुरुवारी मतमोजणी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करून शुक्रवारपासून सुरू करण्याची भूमिका जाहीर केली होती. परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत मतमोजणीनंतरच्या कामातच कर्मचारी होते. परिणामी आता शनिवारी महसूल कर्मचारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.निवडणुकीची यंत्रे सील; अहवाल आयोगाकडेऔरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या सभागृहात मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर मतदान प्रक्रि येसाठी वापरण्यात आलेल्या २०२१ नियंत्रण यंत्र संच (कंट्रोल युनिट) सील करून ते किलेअर्क येथील शासकीय कला महाविद्यालयाच्या सभागृहात ठेवण्यात आले आहेत. मतदान यंत्रातील सर्व डाटाची माहिती निवडणूक आयोगाकडे अहवाल रुपाने देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दुपारचे तीन वाजले. मतमोजणी प्रक्रियेत १३० मतमोजणी सहायक, १३७ मतमोजणी पर्यवेक्षक, १३२ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व अहवाल दिल्यानंतर यंत्रणेने मोकळा श्वास टाकला.------------
काम बंद आंदोलनाबाबत आज चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:07 AM